टॉप बातम्या

वनोजा (देवी) येथील युवकाला रान डुकराने केले गंभीर जखमी

                       (संग्रहित फोटो) 

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
मारेगाव, (ता.१४) : तालुक्यातील वनोजा (देवी) येथील शेतशिवारात शेती मध्ये काम करत असतांना  रानडुकराने हल्ला करून ऐका ३० वर्षीय तरुणाला जखमी केले.
हनुमान चिंधुजी आस्वाले असे रान डुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
भर दिवसा शेतात काम करीत असताना जंगली डुकर शेतकऱ्यांवर चालून अचानक आल्याने काही कळायच्या आत आस्वाले ह्या तरुणा ला पोटावर हल्ला करून जखमी केल्याचे माहिती मिळाली आहे. जखमीची हालत गंभीर असून त्याला वणी तालुक्याला रवाना करण्यात आले. असे रोशन शिंदे यांनी सांगितले.

वणीतून प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे हलवण्यात आले

आमच्या प्रतिनिधीनी याबाबत शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, वणी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले, परंतु जखमीची हालत जास्त असल्याने त्याला चंद्रपूर येथे हलवण्यात आले.
मात्र, शिंदे पुढे म्हणाले की, ही घटना एक नसून या आधी ही झाल्या आहेत. अशा तीन घटना घडल्या परंतु वन विभाग जंगली प्राण्यावर कुठलेच नियंत्रण आणू शकत नसल्याने सामान्य माणसाला वन्य प्राण्यापासून जीव गमवावा लागतो. अशी खंत त्यांनी 'सह्याद्री ई न्यूज' बोलून दाखवली. 
आता तरी वन विभागाने डोळे उघडून घटनेचे गांभीर्याने घेऊन जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली.
Previous Post Next Post