सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
गडचांदुर, (ता.७) : मा. प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांचे निर्देशानुसार, केंद्रातील मोदी सरकार ने पेट्रोल आणि डिझेल दरांमध्ये केलेल्या अवास्तव दरवाढीचा विरोध करण्याकरिता संपूर्ण राज्यात सोमवार दि. ७ जुन २०२१ ला काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
गडचांदुर येथे आमदार सुभाष भाऊ धोटे यांचे मार्गदर्शनात सोमवार देि. ७ जून २०२१ ला सकाळी ११ वाजता स्व. राजीव गांधी चौक पेट्रोल पंप समोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली.
तालुका कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात पेट्रोल डिझेल गॅस इंधन दरवाढीचा जनतेच्या पैशावर होत असलेल्या गंभीर परिणामाचा उल्लेख केला. २०१४ पूर्वी भाजप ला डायन वाटणारी महागाई आता त्यांना आपलीशी वाटत आहे. मोदी सरकार इंधन दरवाढीवर संपूर्णपणे अपयशी ठरले असून आता जनतेने त्यांना घराचा रस्ता दाखविण्याची वेळ आली आहे. प्रधानमंत्री यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा अशी मागणी तालुका काँग्रेस तर्फे करण्यात आली.
या प्रसंगी नगराध्यक्ष सौ.सविता टेकाम, ज्येष्ठ नेते हंसराज चौधरी, पप्पय्या पोंनमवार शहराध्यक्ष संतोष महाडोळे, गटनेता तथा सोशल मीडिया अध्यक्ष विक्रम येरणे, सभापती राहुल उमरे, उपसरपंच आशिष देरकर, नगरसेवक अरविंद मेश्राम, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, महासचिव विलास मडावी, माजी शहराध्यक्ष रोहित शिंगाडे, महिला शहर अध्यक्ष अर्चना आंबेकर, प्रीतम सातपुते, आशिष वांढरे, संजय इटनकर, मुनमुन कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिस विभागातर्फे ए पी आय प्रमोद शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
पेट्रोल डिझेल स्वयंपाक गॅस दरवाढीचा काँग्रेस तर्फे निषेध
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 07, 2021
Rating:
