मारेगाव काँग्रेस कमेटीचे पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी विरोधात धरणे आंदोलन

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (ता.७) : सतत वाढत असलेल्या पेट्रोल , डिझेल, गॅस दरवाढीने सामान्य जनता त्रस्त झाल्याने मारेगाव काँग्रेस कमेटीच्या वतीने आज रोजी ७ जून  केन्द्र शासनाच्या विरोधात एकदिवसीय धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले. 

कोरोनाच्या प्रादुर्भावाने सामान्य नागरीक आर्थिक विवंचणेत असताना दैनंदिन वाढणाऱ्या जिवनावश्यक तेल,पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले. वर्षा भऱ्यापासून जनता घरात आहेत आणि केन्द्र शासनाने लॉकडाऊन काळात सामान्य जनतेच हित न पहाता वरीलप्रमाणाचे बेसुमार भाव वाढविले आहेत. २०१४ पूर्वी भाजपाला डायन वाटणारी महागाई त्यांना आता आपलीशी वाटत आहे. केंद्रातील मोदी सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले असून आता जनतेनी घराचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे. केन्द्र सरकारने महागाई नियंत्रणात आणून सामान्य जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा या महागाई विरोधात आंदोलन सुरु करण्यात येईल असा, ईशारा मारेगाव काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला.

या प्रसंगी कृ.उ.बा. समितीचे सभापती नरेंद्र ठाकरे, जि. प. सदस्य अरूणाताई खंडाळकर, पं.स.सभापती शितल पोटे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष शंकरराव मडावी यांच्या नेतृत्वात येथील पेट्रोल पंपावर करण्यात आले. या लाक्षणीय धरणे आंदोलनात जिल्हा सरचिटनिस रमण डोये, महिला काँग्रेस कमेटी सुप्रिया जोगी, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष आकाश बदकी, शशिकांत आंबटकर, रविंद्र धानोरकर, प्रफुल विखणकर आदी काँग्रेस कार्यकर्ते होते. 
 
मारेगाव काँग्रेस कमेटीचे पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी विरोधात धरणे आंदोलन मारेगाव काँग्रेस कमेटीचे पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी विरोधात धरणे आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on June 07, 2021 Rating: 5
Powered by Blogger.