वणी काँग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारचा निषेध ; 'महागाई' विरोधात उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी, (ता.७) : पेट्रोल डिझेल व गॅस वरील महागाई कमी करण्याची मागणी काँग्रेस च्या वतीने दि ७ जून २२१० रोजी वणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे राष्ट्रपती यांच्याकडे करण्यात आली. भाजप केंद्र सरकार ने पेट्रोल डिझेल व गॅस सिलेंडर वरील किंमती महागाई वाढवली आहे. भाजप सरकारकडून पेट्रोल डिझेल कराच्या रूपात लाखो करोडो रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाई च्या खाईत लोटले आहे. सरकार इंधन तसेच जीवनावश्यक वस्तुच्या किंमती वाढवून सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. करीत सामान्य जनतेच्या हितासाठी लाठीवाला पेट्रोल पंप समोर काँग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारचा महागाई विरोधात निषेध करण्यात आला व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेस चे वणी तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर डॉ. मोरेश्वर पावडे प्रा.टिकाराम कोंगरे, इजहार शेख, राजाभाऊ पाथरडकर, प्रमोद निकुरे शहराध्यक्ष काँग्रेस, ओम ठाकूर, प्रमोद लोणारे, सुनील वरारकर, हफिज रहेमान, रफिक भाई रंगरेज, अशोक नागभीडकर, सौं संध्याताई बोबडे, प्रदीप खेकारे, अभिजित सोनटक्के, निकेश पानघाटे, स्वप्नील सोनेकर इत्यादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वणी काँग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारचा निषेध ; 'महागाई' विरोधात उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन वणी काँग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारचा निषेध ; 'महागाई' विरोधात उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on June 07, 2021 Rating: 5
Powered by Blogger.