नवीन वीज उपकेंद्राच्या माध्यमातून जिल्ह्याची विजेची अडचण दूर होण्यास मदत होईल - ऊर्जामंत्री नितीन राऊत
सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे
बीड, (ता. ११) : बीड हा शेतकऱ्यांचा जिल्हा असून कृषी उपयोगासाठी विजेची मागणी वाढत आहे यामुळे आज उद्घाटन झालेल्या 33/11 केव्ही सबस्टेशनच्या माध्यमातून जिल्ह्याची विजेची अडचण दूर होण्यास मदत होईल असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज केले.
राज्याचे उर्जामंत्री श्री राऊत यांच्या हस्ते नेकनूर येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी महावितरणच्या वतीने उच्च दाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत नव्याने उभारण्यात आलेल्या 33/11 केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमास आमदार संजय दौंड, राजकिशोर मोदी, पृथ्वीराज साठे ,रविंद्र दळवी, नारायण शिंदे, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक भुजंग खंदारे आदी उपस्थित होते. या प्रसंगी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी मंत्री महोदय यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तसेच नेकनूर ग्रामस्थांच्यावतीने नारायण शिंदे यांनी स्वागत केले.
उर्जा मंत्री नितीन राऊत यांचे बीड मध्ये भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे आज मराठवाडा दौऱ्यावर आगमन झाले. आज त्यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रम आटोपून सायंकाळी बीड शहरात भेट दिली . यावेळी बीड शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी त्यांच्यासमवेत आमदार संजय दौंड, बीडचे नगराध्यक्ष भूषण क्षीरसागर, राजकिशोर मोदी, पृथ्वीराज साठे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या दि. ११ व १२ जून रोजी दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यात ऊर्जामंत्री नितीन राऊत हे औरंगाबाद , बीड व परभणी या जिल्ह्यांमध्ये भेट देणार आहेत.
नवीन वीज उपकेंद्राच्या माध्यमातून जिल्ह्याची विजेची अडचण दूर होण्यास मदत होईल - ऊर्जामंत्री नितीन राऊत
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 13, 2021
Rating:
