तासाभराच्या पावसाने बीड शहराची केली गटार गंगा


सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे 
बीड, (ता.१२) : पावसाळा सुरू झाला आणि बीड शहरात क्षीरसागर कुटुंबाच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या नगरपरिषदेच्या विकास कामांचे बंग फुटु लागले आहे, गल्लीबोळातील रस्त्यांना ओड्याचे व नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दर दिवस कुठे ना कुठेतरी रोड नाली कामाचा शुभारंभ करणाऱ्या नगराध्यक्ष साहेबांना, गल्लीबोळातील नाल्या ड्रेनेज साफसफाई स्वच्छता मोहीम करण्याची गरज भासलेली दिसत नाही. अंडरग्राउंड ड्रेनेज व पाण्याच्या पाइपलाइन सर्वच रोडची दुरावस्था खड्ड्या मध्ये साचले आहे. तुंबलेल्या नाल्यातील रस्त्यांवर साचलेले पाणी, चिखलमय रस्ते, यावर्षीच्या पहिल्याच पावसात बीड शहरातील स्वच्छ शहर सुंदर शहरचे तीन तेरा वाजलेले दिसून येत आहेत, दरवर्षी पावसाच्या पुर्वी नालेसफाई व पावसाळापूर्व कमी करणे गरजेचे असताना ही बीड नगर पालिका प्रशासन व राज्यकर्ते हे नवीन कामांचे उदघाटन करत स्वतःची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त आहेत. परंतु आधीच महामारी व त्यात पुन्हा रस्त्यांवर आलेले हे दुषित पाण्यांमुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे ही शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रशांत डोरले यांनी सांगितले आहे.

बीड शहरातील भाजी मंडई, नेहरूनगर, बुंदेलपुरा, जुनी भाजी मंडई, सम्राट चौक, हनुमान चौक सारख्या भागांमध्ये गल्लीबोळातील रस्त्यांना ओढ्या नाल्याचे स्वरूप आले आहे, यातूनच भागात प्रचंड प्रमाणात घाण, दुर्गंधी पसरली आहे, त्यामुळे बीडच्या विकासाचे महामेरू असलेले नगरपालिकेचे भुषण राज्यकर्ते व कार्यक्षम मुख्याधिकारी साहेब यांनी याकडे तात्काळ लक्ष घालून ही तुंबलेली मोठे नाले तात्काळ साफसफाई करणे गरजेचे आहे तसेच पावसाळी पुर्वीची सर्व स्वच्छता व अन्य कामे लवकरात लवकर करावी अन्यथा शिवसंग्राम अकॅशन मोड मध्ये येऊन कामे करून घेईल अशी मागणी यावेळी प्रशांत डोरले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
तासाभराच्या पावसाने बीड शहराची केली गटार गंगा तासाभराच्या पावसाने बीड शहराची केली गटार गंगा Reviewed by सह्याद्री चौफेर on June 13, 2021 Rating: 5
Powered by Blogger.