टॉप बातम्या

हातावरचे पोट असणाऱ्यांना परधान समाज कर्मचारी संघटनेच्या वतीने मदत

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
किनवट, (ता.१३) :  नादेंड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात आदिवासी बहुल खेड्यापाड्यात मोठया प्रमाणात आदिवासी समाज राहतो. मात्र, गेली दोन वर्षापासून कोरोनाने थैमान घालत या भागातील लोकांचे  अनेक कुटुंब या कोरोना काळात उद्वस्त झालेली पाहायला मिळाली. यातच काही कुटुंबातील लोकांनी आपल्या घरातील कर्ता पुरुष गमावला तर काही लोकांच्या हाताला काम नाही. हातावरचे पोट असणाऱ्या चे हाल होतांना दिसत होते.
अशा परिस्थितीतीला सामोरे जाण्यासाठी परधान समाज कर्मचारी संघटनेच्या वतीने अनाथ, अपंग, विधवा, मजूर, भूमिहीन, दारिद्र्य रेषेतील लाभार्थी, उपेक्षित - दुर्लक्षित वेडसर अशा ऐकुन ५० कुटुंबांना अन्नपूर्णा गृह उपयोगी किट किराणा सामान देण्यात आला. यात तलाईगुडा, भिलगांव, पळशी, लालुनाईकतांडा, मांडवी, गणेशपुर, नागापूर, दरसावंगी, लिंगी, उनकेश्वर, बोत, उमरी, निराळा या गावांचा यात समावेश आहे. तसेच सर्व कर्मचारी वर्गातील लोकांनी गुगल पै ,फोन ऑनलाईन पद्धतीने निधी जमा केला. या उपक्रमात संघटनेने लोकांच्या दारापर्यंत जाऊन त्यांना मदत करण्यात आली.
यावेळी परधान समाज संघटनेचे अध्यक्ष सुभाष कनाके 
कार्याध्यक्ष गोपाल कनाके, सचिव मुरहारी कनाके, उपाध्यक्ष रामदास मेश्राम, कोषाध्यक्ष शोभा कुमरे, सहकोषाध्यक्ष गणेश डोंगरे, तसेच कैलास पंधरे, रमेश परचाके, संतोष पहुरकर, शशांक कनाके, सौरभ कनाके, या सर्वाच्या मदतीने हा उपक्रम यशस्वी झाला.
Previous Post Next Post