डोलडोंगरगाव (मच्छिन्द्रा) येथील शेतकऱ्याचा विजेच्या धक्याने मृत्यू

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (ता.१३) : मारेगाव तालुक्यातील डोलडोंगरगाव (मच्छिन्द्र) येथील शेतकऱ्याला विद्युत तारेचा धक्का लागल्याने सुरेश उद्धव बारेकर वय (५२) दि.१२ जुन रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान मुत्यु झाला.
परिसरात सध्या शेतीचे मशागत, पेरणीची कामे जोरात सुरु असून, पावसाच्या सरीही अधून मधून येत आहे. अशातच बोरकर हे शेतात काम करीत असताना विद्युत तारेचा धक्का लागल्याने त्यांचा मुत्यु झाला. सुरेश बारेकर यांच्या पश्चात दोन पत्नी, तिन मुले असा परिवार आहे. या घटनेने डोल (मच्छिन्द्र) परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

डोलडोंगरगाव (मच्छिन्द्रा) येथील शेतकऱ्याचा विजेच्या धक्याने मृत्यू डोलडोंगरगाव (मच्छिन्द्रा) येथील शेतकऱ्याचा विजेच्या धक्याने मृत्यू Reviewed by सह्याद्री चौफेर on June 13, 2021 Rating: 5
Powered by Blogger.