सह्याद्री न्यूज | दिलदार शेख
मारेगाव, (ता.८) : यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, तालुक्यातील हा समाज अनेक गोष्टी पासून वंचित आहे.
आदिवासी समाजाच्या योजनेचा लाभ या समाजापर्यंत पोहोचत नसल्याने त्यांच्या पर्यंत योजनेचा लाभ कसा पोचवता येईल व आदिवासी समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणता येईल या अनुषंगाने मारेगाव तालुकाध्यक्षपदी अनिल गेडाम यांची निवड बिरसा क्रांती दल चे संस्थापक अध्यक्ष मा. दशरथ जी मडावी यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ 'बिरसा क्रांती दल' च्या कार्यालयामध्ये नियुक्ती पत्र देवून पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या.
यावेळी बिरसा क्रांती दलाचे प्रदेश उपाध्यक्ष दिनेश अंबुरे, प्रदेश महासचिव प्रमोद घोडाम व जिल्हाध्यक्ष प्रा. कैलास बोके व मारेगाव तालुका उपाध्यक्ष व सचिव यांच्या सह इतर पदधिकारी उपस्थित होते.
बिरसा क्रांती दलच्या मारेगाव तालुकाध्यक्ष पदी अनिल गेडाम यांची नियुक्ती
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 08, 2021
Rating:
