२४ तासात कोरोनाबधितांपेक्षा कोरोनामुक्त जास्त


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
यवतमाळ, (ता. ८ जून) : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या आजही जास्त आहे. आज ६८ जण कोरोनामुक्त झाले असून ३३ जण पॉझेटिव्ह आले आहेत तर आज जिल्ह्यात एकाही रुग्णांची मृत्यूची नोंद नाही हे विशेष.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण २९१८ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ३३ जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर २८८५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७२८ रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती २८६ तर गृह विलगीकरणात ४४२ रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ७२४५२ झाली आहे. २४ तासात ६८ जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ६९९४५ आहे. तर जिल्ह्यात एकूण १७७९ मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत ६ लक्ष ५३ हजार ८९२ चाचण्या झाल्या असून त्यापैकी ५ लक्ष ८० हजार ४१० निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर ११.०८ असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर १.१३आहे तर मृत्युदर २.४६ आहे.             

पॉझेटिव्ह आलेल्या ३३ जणांमध्ये २१ पुरुष आणि १२ महिला आहेत. यात आर्णी तालुक्यातील १, बाभूळगाव येथील ३, दिग्रस २, महागाव येथील ४, मारेगाव ३, पांढरकवडा २, पुसद येथील ६, उमरखेड ३, वणी येथील १, यवतमाळ ६ तर झरीजामणी येथील २ रुग्ण आहे.        

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात २०७० बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ११ डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि ३४ खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या २२७९ आहे. यापैकी २०९ बेड रुग्णांसाठी उपयोगात असून २०७० बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण ५७७ बेडपैकी ८० बेड रुग्णांसाठी उपयोगात असून ४९७ बेड शिल्लक, ११ डीसीएचसीमध्ये एकूण ५२६ बेडपैकी ७५ रुग्णांसाठी उपयोगात तर ४५१ बेड शिल्लक आणि ३४ खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण ११७६ बेडपैकी ५४ उपयोगात तर ११२२ बेड शिल्लक आहेत.
२४ तासात कोरोनाबधितांपेक्षा कोरोनामुक्त जास्त २४ तासात कोरोनाबधितांपेक्षा कोरोनामुक्त जास्त Reviewed by सह्याद्री चौफेर on June 08, 2021 Rating: 5
Powered by Blogger.