राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते पेरणीचा शुभारंभ; विधिवत बैल तिफण पूजन


सह्याद्री न्यूज नेटवर्क |

अमरावती, (ता.१३) : 12मान्सूनचे जिल्ह्यात दमदार आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मूळचे शेतकरीच असलेले राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनीदेखील आज  पेरणीचा शुभारंभ केला. 

राज्यमंत्री बच्चू कडू व त्यांच्या पत्नी प्रा.डॉ.नयना कडू यांनी विधिवत बैल तिफण पूजन करून पारंपरिक पद्धतीने पेरणीला सुरूवात केली. कोरोनामुळे आधीच सगळे संकटात सापडले आहे.अशातच सततच्या लॉकडाऊनमुळे खते, बियाणेदेखील उपलब्ध होतील की नाही अशी शंका असतानाच लॉकडाऊन शिथील झाले आणि शेतकऱ्यांमध्ये पेरणीसाठी उत्साह संचारला. मात्र, स्वतः राज्यमंत्री बच्चू कडूदेखील आपल्यासोबत शेतात पेरणी करणार हे बघून शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

यावेळी प्रहारचे ज्येष्ठ पदाधिकारी दिपक भोंगाडे, राहुल म्हाला, संदीप मोहोड, गौरव बोंडे, सतीश मोहोड, मनिष मोहोड, उमेश कपाडे व गोलू ठाकुर आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते पेरणीचा शुभारंभ; विधिवत बैल तिफण पूजन राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते पेरणीचा शुभारंभ; विधिवत बैल तिफण पूजन Reviewed by सह्याद्री चौफेर on June 13, 2021 Rating: 5
Powered by Blogger.