सह्याद्री न्यूज | दिलदार शेख
मारेगाव, (ता.२५) : ओबीसी समाजाची जनगणना करा, रद्द केलेले राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे व यासह आदी मागण्याचे निवेदन ओबीसी महासंघाचे वतीने तहसीलदार मार्फत प्रधानमंत्री यांना देण्यात आले.
निवेदनातून ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करा, सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले स्थानिक स्वराज्य संस्था मधील राजकीय आरक्षण पूर्ववत करा,मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यात येऊ नये, ओबीसी समाजाचे यवतमाळ, नंदुरबार, चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, ठाणे, नाशिक, रायगड व पालघर या जिल्ह्यातील आरक्षण १९ टक्के करा, ओबीसींच्या रिक्त पदांचा अनुशेष भरा, पदोन्नतीमध्ये ओबीसींना आरक्षण द्या आधी मागण्याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी जि.प.सदस्य अरुणा खंडाळकर, पं.स.सभापती शितल पोटे किरण देरकर, सुषमा काळे, जिजा वरारकर, प्राची मत्ते, अक्षदा ढोके, चेतना पिंपळशेंडे, जयनारायण बदकी, रवींद्र धानोरकर, भालचंद्र ठाकरे, आर. एस. बेहरे, मुज्जफर शेख, प्रवीण आसवले यांचेसह तालुक्यातील ओबीसी समाजाचे महिला व पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते.
ओबीसी महासंघाचे तहसीलदार मार्फत प्रधानमंत्री यांना निवेदन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 25, 2021
Rating:
