मारेगाव रोडवर वाहन चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटले अन..झाला अपघात

सह्याद्री न्यूज | विवेक आवारी
मारेगाव, (ता.२५) : मांगरूळ वरून मारेगावकडे जाताना कार चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटले आणि गाडी काळे यांच्या शेतात घुसली. ज्यामध्ये गाडी चालक मालक जखमी झाला. ही घटना आज रोजी 4:45 वाजताच्या दरम्यान घडली.

प्राप्त माहितीनुसार विपुल दिगंबर राजगडकर (२५) रा. मांगरूळ वाहन क्र. Mh12 FZ 1536 महिंद्रा झायलो ही गाडी घेऊन निघाला असतांना मारेगाव रोड वरील इंडियन पेट्रोल पंप जवळ त्याचे गाडी वरून नियंत्रण सुटले आणि काळे यांच्या शेतात गाडी सह घुसला. यावेळी गाडीची समोरची बाजू चपकली असून त्याला किरकोळ मार लागल्याचे समजते. सुर्दैवाने जीवित हानी झाली नसून दरम्यान, त्याला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मारेगाव रोडवर वाहन चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटले अन..झाला अपघात मारेगाव रोडवर वाहन चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटले अन..झाला अपघात Reviewed by सह्याद्री चौफेर on June 25, 2021 Rating: 5
Powered by Blogger.