सहाय्यक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते मौजा मांडवा येथील आदिमांना वनजमीन (पट्टे) वितरित
सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी-जामणी, (ता.२५) : अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम २००६ नियम २००८ व सुधारीत नियम २०१२ च्या अमंलबजावणी अंतर्गत दिनांक २४ जून, २०२१ रोजी उपविभागीय स्तरीय वनहक्क समिती केळापूर अंतर्गत मौजे मांडवा ता. झरी जामणी येथील वैयक्तीक वनहक्क धाराकांना मा.श्री. विवेक जॉनसन, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, केळापूर यांच्या हस्ते वन जमिनीचे (पट्टे) वितरीत करण्यात आले.पट्टे वाटपात आदिम कोलाम जमातील एकूण ९ दावेदार श्री महादू नानाजी आत्राम, तुकाराम भवण्या आत्राम, चिनू भवण्या आत्राम, रामा लखामा आत्राम, लिंबा भवण्या आत्राम, वासुदेव अय्या आत्राम, महादेव अय्या आत्राम, सुरेष लखमा आत्राम, सीताराम लेतू टेकाम यांना पट्टे वाटप करण्यात आले.
ह्याप्रसंगी मा. श्री ब्रामनवाडे नायब तहसीलदार झरी जामणी, मा. श्री गजानन मुंडकर गटविकास अधिकारी झरी जामणी, तालुका वनहक्क व्यवस्थापक झरी जामणी श्री संजय तीळेवाड, तालुका व्यवस्थापक श्री शेलेष कनेर केळापूर . मंडळ अधिकारी . श्री नीमेकर, तलाठी श्री घुसुंगे , ग्राम सचिव श्री शेडमाके, मांडवा सरपंच श्री गंगाधर आत्राम उपस्थित होते.
सहाय्यक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते मौजा मांडवा येथील आदिमांना वनजमीन (पट्टे) वितरित
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 25, 2021
Rating:
