प्रा.डॉ.माणिक ठिकरे सर यांचे नागपूर येथे निधन


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (ता.४) : मारेगाव कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातचे प्रा.डॉ. माणिक ठिकरे यांचे नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये दि. ४ जुन रोजी हृदय विकाराच्या झटक्याने उपचारादरम्यान निधन झाले.
कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय तथा दैनिक तरुण भारतचे प्रा. डॉ.ठिकरे मारेगाव प्रतिनिधी होते. या धक्कादायक घटनेने तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
परिसरात ते मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने लाखो चाहता वर्ग त्यांचा होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रा.डॉ. टिकरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा मोठा आप्तपरिवार आहे.
प्रा.डॉ.माणिक ठिकरे सर यांचे नागपूर येथे निधन प्रा.डॉ.माणिक ठिकरे सर यांचे नागपूर येथे निधन Reviewed by सह्याद्री चौफेर on June 04, 2021 Rating: 5
Powered by Blogger.