नागरिकात जनजागृती करून माथार्जून येथे लसीकरण


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी  
झरी, (ता.४) : कोरोना संसर्गाचा फैलाव थांबविण्यासाठी गाव पातळीवर लसीकरण सत्र आयोजीत करण्यात आले. या लसीकरण सत्रामध्ये उपकेंद्र माथार्जुन येथे  लसीकरणचे तीन सत्र आयोजित करण्यात आले. लसीकरणाच्या प्रथम सत्रामध्ये 28 डोज, दुसऱ्या सत्रात 38 डोज तर तिसऱ्या सत्रामध्ये 31 डोज असे एकूण 97 लस नागरिकांना देण्यात आल्या
 या लसीकरणात 45 वर्षा वरील स्त्री,पुरुष व फ्रंट लाईन वर्कर यांना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्याच्या दृष्टीने व संभाव्य दुसऱ्या लाटे पासून सुरक्षितेची काळजी म्हणून गावपातळीवर लसीकरण राबविण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासन कर्मचारी लस घेण्यासाठी जनजागृती करून लसी चे महत्व नागरिकांना सांगून लस घेण्यासाठी प्रवृत्त करीत आहे. आवाहन व जनजागृती करीत असताना आरोग्य सेविका अर्चना गोरले, तलाठी श्री.धीरज चव्हाण, सचिव श्री.मनोज दासरवार, पोलीस पाटील प्रकाश गेडाम, आशा वर्कर अनिता मडावी, माया मरस्कोल्हे व डेटा ऑपरेटर अजय मडावी यांनी विशेष प्रयत्न केले आहे.
नागरिकात जनजागृती करून माथार्जून येथे लसीकरण नागरिकात जनजागृती करून माथार्जून येथे लसीकरण  Reviewed by सह्याद्री चौफेर on June 05, 2021 Rating: 5
Powered by Blogger.