सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (ता.२९) : घोडधरा येथे शेतकामासाठी ठेवलेल्या माणसाच्या पत्नीवर मालकाने घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना शनिवार दि.२६ जुन रोजी दुपारी दोन वाजता घडली होती.
माणूस शेतामध्ये काम करत असताना सालगड्याच्या घरी त्याचा डब्बा आणण्यासाठी गणेश आनंद जीवतोडे (४५) हा गेला असता, सालगड्याच्या पत्नीचा मोबाईल चार्जिंगला लावून असलेल्या खोलीमध्ये शिरून चार्जिंगला लावून असलेला मोबाईल काढुन घेतला. माणसाची पत्नी आपला मोबाईल मागण्यांसाठी गेली असता, तिला खाली पाडून विनयभंग केल्याची तक्रार पिडीत महिलेने मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये सोमवार दि.२८ जुन रोजी सांयकाळी दाखल केली.
सदर तक्रारी वरुन संशयित आरोपी गणेश जीवतोडे रा.घोडधरा यांच्या विरुद्ध कलम ३५४/४५२/५०६ सह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास मारेगाव पोलीस करित आहे.
शेतमालकांकडून सालगड्याच्या पत्नीचा विनयभंग, घोडधरा येथील घटना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 29, 2021
Rating:
