कोल्हापुरच्या मुंबईस्थित दोन समाजसेवकांचा बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे सन्मान


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
बुलढाणा, (ता.२९) : शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीतील भुदरगड या ऐतिहासिक तालुक्यातील बामणे या गावचे दोन अभ्यासु साहित्यिक समाजसेवक सुनिल बोरणाक आणि संदीप मेंगाणे यांना ह्या वर्षीचा बुलडाणा फिल्म सोसायटीचा अनुक्रमे समाज गौरव पुरस्कार २०२० आणि समाज रत्न पुरस्कार २०२० जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 लहानपणापासूनच समाज सेवेची आवड असणाऱ्या दोघांनीही अनेक मंडळे, प्रतिष्ठान व मित्रांच्या मदतीने मदत कार्यात पुढाकार घेतला. राज्यस्तरीय शिवसह्याद्री प्रतिष्ठाण या राजकारण विरहित प्रतिष्ठान मार्फतही ते समाजकार्यात अग्रेसर आहेत.

गेली अनेक वर्षे आयुर्वेदिक मोफत आरोग्य शिबीर राबवणे, रक्तदान शिबीर राबवणे, काही शालेय उपक्रम जसे एक वही एक पेन जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना थोडी शैक्षणिक मदत मिळेल, ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून कचरा साफ करणे, गरजुंना मोफत अन्नधान्य वाटप, दाल खिचडी वाटप, कोरोना काळात सेफ्टी मास्क, अर्सेनिक गोळया, सॅनिटायजर, कोविड किट वाटप, झोपडपट्टी एरिया सॅनिटाईस करणे, खेड्यातील लोकांना शेतकरी मंडळ चालू करून देणे, महिलांचे - पुरुषांचे बचत गट चालू करणे व त्यांना कर्ज मंजूर करून देणे, दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण देणे व मोफत शिलाई मशीन वाटप करणे, पूरग्रस्त लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे, वृक्षारोपण करणे, शासन आणि प्रशासनाच्या मदतीने रस्त्यांची डागडुजी करणे ह्या सारखी कामे सातत्याने ते सातत्याने करत आहेत.
त्यांच्या या सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी बुलढाणा फिल्म सोसायटी तर्फे सुनील बोरणाक यांना समाजगौरव तर संदीप मेंगाने यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर झाल्याचे सोसायटीचे अध्यक्ष भास्कर वाडेकर यांनी जाहीर केले आहे.
कोल्हापुरच्या मुंबईस्थित दोन समाजसेवकांचा बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे सन्मान कोल्हापुरच्या मुंबईस्थित दोन समाजसेवकांचा बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे सन्मान Reviewed by सह्याद्री चौफेर on June 29, 2021 Rating: 5
Powered by Blogger.