सह्याद्री न्यूज नेटवर्क |
यवतमाळ, (ता.२९) : देशासह राज्यात ही पेट्रोल डिझेल व गॅसच्या दरवाढीचा भडका उडाला असून दिवसेन दिवस इंधन दरवाढ होतच चालली आहे. याचा फटका सर्वसामान्यांसह शेतकरी वर्गास सुध्दा बसत आहे.पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने व खर्च झेपावत नसल्याने शेतकामास लागणारी यंत्रसामग्री ठप्प पडण्याची वेळ आली आहे.
एकीकडे गॅसचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकासह गोरगरीबांच्या झोपडीत दोन वर्षापुर्वी तोडलेल्या चुली परत चेततांना दिसू लागल्या आहेत.तर सिलेंडर हे शोभेची वस्तू बनून झोपडीत अडचण निर्माण करत आहेत.
या जुलमी केंद्र सरकारने गरीबांच्या झोडीत डोकावून गरिबींच्या नजरे पाहुन व शेतकर्यांचा शेतात गळत असलेल्या घामाची कदर करून तात्काळ इंधन आणि गॅसची दरवाढ कमी करून जनतेला दिलासा द्यावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी महागांव तर्फे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी ही केंद्र सरकारची राहील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ कमी करा. - राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पार्टीचा आंदोलनाचा इशारा.
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 29, 2021
Rating:
