कुपनधारक धडकले महागांव तहसील कार्यालयावर

 
सह्याद्री न्यूज नेटवर्क |
महागांव, (ता.२९) : महागांव येथील स्वस्त धान्य दुकानदारा कडुन शासकीय वेळेत धान्य मिळत नसल्याने रोजमजुरी करणार्‍या कुपनधारकांची कुचंबणा होत असल्याने संतप्त झालेल्या कुपनधारकांनी थेट तहसील कार्यालयात घुसून तहसीलदार नामदेव इसाळकर यांचे समोर आपबीती मांडुन स्वत धान्य दुकानदारा विषयी तक्रार केली आहे.
 
संपूर्ण शहरात दोन स्वस्त धान्य दुकानाव्दारे धान्याचा वाटप केल्या जात होता. परंतु दोन्ही ही दुकाने भष्टाचाराच्या विळख्यात अडकल्या गेल्याने,मागील अनेक वर्षां पासून प्रभारी दुकानदाराच्या भरवशावर येथील कारभार चालत होता.
   
मागील काही दिवसांपासुन अंबोडा येथील महिला बचत गट हे दोन्ही दुकाने प्रभारावर चालवत होते.संपर्ण शहरास एकाच दुकानाव्दारे वाटप करताना तान पडत असल्याने दुसऱ्या एका दुकानास जोडण्यात आले होते.त्यांचे कडून शासकीय वेळे नुसार धान्य मिळत नसल्याने संतप्त झालेल्या कुपनधारकांनी तहसील कार्यालयावर जाऊन तहसीलदार यांना स्वत धान्य मिळत नसल्याची तक्रार केली आहे.


कुपनधारक धडकले महागांव तहसील कार्यालयावर कुपनधारक धडकले महागांव तहसील कार्यालयावर Reviewed by सह्याद्री चौफेर on June 29, 2021 Rating: 5
Powered by Blogger.