फ्लिपकार्टकडून ३० आयसीयू व्हेंटिलेटर्सची मदत

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (ता. ३०) : कोविडचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीच्या फ्लिपकार्ट कंपनीने राज्य शासनाला ३० आयसीयू व्हेंटिलेटर्सची मदत दिली असून ती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज स्वीकारली. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक रजनीश कुमार उपस्थित होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी फ्लिपकार्टने दिलेली ही मदत नक्कीच उपयुक्त ठरेल. कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना यामुळे जीवदान मिळेल, असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला.

फ्लिपकार्टने यापूर्वी विविध राज्यांना १८० आयसीयू व्हेंटिलेटर्स दिले आहेत, असे रजनीश कुमार यांनी यावेळी सांगितले.
फ्लिपकार्टकडून ३० आयसीयू व्हेंटिलेटर्सची मदत  फ्लिपकार्टकडून ३० आयसीयू व्हेंटिलेटर्सची मदत Reviewed by सह्याद्री चौफेर on June 30, 2021 Rating: 5
Powered by Blogger.