सह्याद्री न्यूज नेटवर्क
महागांव, (ता. ३०) : ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण पुर्ववत लागू करावे, बहुजन समाजास त्या पासुन वंचित ठेऊ नये, पदोन्नती देण्यात यावी. नॉनक्रिमीलियर अट हटविणे, विमुक्त जातीय भटक्या जमातीच्या मुला मुलींना प्रत्येक क्षेत्रात नोकरीची संधी देण्यात यावी.
बहुजन समाजास त्या पासुन वंचित ठेवू नये. अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल. अशा आशयाच्या मागणीचे लेखी निवेदन ओबीसी न्यायहक्क समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी महागांव तहसीलदार नामदेव इसाळकर यांना दिले.
यावेळी नरेंद्र जाधव,युवराज राठोड, रविंद्र पवार,मोहन राठोड, श्रीनिवास जाधव, सुधाकर राठोड, दिलीप चव्हाण, डॉ. तोळाराम चव्हाण, मा.नगरसेवक राजु राठोड महागांव व अन्य बांधव उपस्थित होते.
ओबीसी आरक्षण पूर्ववत करा - ओबीसी न्यायहक्क समितीची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 30, 2021
Rating:
