माहूर चा पोलीस हवालदार लाचलूचपत विभागाच्या जाळ्यात


माहूर, (ता.०१ मे) : नांदेड जिल्ह्यातील माहूर पोलीस स्टेशन येथील कार्यरत असलेले विष्णू मुटकुळे (बकल नं.१७/४३) यांना दहा हजाराच्या मागणीत लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या दि.१ जून रोजीच्या सापड्यात अडकला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यासह माहूर तालुक्यात रेती तस्करांनी हैदोस घातला असून जिल्ह्यातील बहुतांश तालुके व ग्रामीण भाग रेती तस्करांच्या रडार वर आहे. त्यांचे वर कारवाई करा असे स्पष्ट आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले असतांना स्थानिक प्रशासन मात्र दुर्लक्ष करून आपले हात ओले करून शासनाचा लाखोंचा महसूल बुडवून वाळू माफि्यांना गलेलठ्ठ करण्याचा प्रकार सुरु आहेत. अशातच एका पोलीस हवालदराला आपले हित साधताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकावे लागले. 
माहूर ठाण्यात कार्यरत असलेले विष्णू उत्तमराव मुटकुळे (बकल नं.१७/४३) असे त्यांचे नाव आहे. यांच्याकडे रेतीसह ट्रक्टर जप्त केलेल्याचा तपास होता, या ट्रॅक्टर मालकावर व मित्रावर कारवाई करत नाही, यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितली. मात्र,लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदारांनी (१७ मे) रोजी नांदेड येथे जाऊन विष्णू मुटकुळेविरुद्ध तक्रार दिली. लाच लुचपत प्रतिबंद विभागाने पडताळणी सापळा लावला.
या सापळ्यात हवालदारांनी दहा हजर रुपयाची लाच स्वीकारण्याचे मान्य केले. लाच निष्पन्न झाल्यानंतर त्याचेविरुद्ध माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक कल्पना बावरकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या पथकांनी केली आहे.

माहूर चा पोलीस हवालदार लाचलूचपत विभागाच्या जाळ्यात माहूर चा पोलीस हवालदार लाचलूचपत विभागाच्या जाळ्यात Reviewed by सह्याद्री चौफेर on June 02, 2021 Rating: 5
Powered by Blogger.