सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (ता.२ जून) : दिनांक १ जून २०२१ रोजी पोलिस पाटील संघटननेच्या वतीने मा. तहसीलदार यांना तालुक्यातील पोलिस पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लस देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. पोलिस पाटील अधिनियम १९६४ नुसार पोलीस पाटील यांची नियुक्ती केली असून पोलिस पाटील यांना कोरोनाची लस मिळाली आहे. पोलिस पाटील हे गावातील कोरोना प्रतिबाधीत उपाय योजनांचे शासकीय कार्य, कोरानाविषयी जनजागृती, शासकीय कामात हजर राहणे इत्यादी कामात आपली जबाबदारी पार पाडत असतात त्यांच्यामुळे कुटुंबातील सदस्यांना कोरोना होण्याची भीती असल्यामुळे १८ वर्ष वरील पोलिस पाटील कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लस उपलब्ध करण्यात यावी असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. शासन नियमानुसार ४५ वर्षावरील व्यक्तीला लस दिली जात आहे. परंतु काही पोलिस पाटलांच्या परिवारातील सदस्याचे वय ४५ वर्ष वरील नसून त्यांच्या पत्नीचे,मुलांचे वय कमी आहे. शिवाय गावाचा पाटील शासकीय कामात हजर राहत असून आपली जबाबदारी पार पाडत असतात. यामुळे कोरोना संसर्ग लक्षात घेऊन त्यांच्या ही कुटुंबातील सदस्यांनां लस मिळावी अशी मागणी संघटनेने केली आहे. यावेळी पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष सुनील धवणे, विनोद पेरकावर, नारायण, चरणदास गंडतवार, प्रकाश गेडाम, प्रभाकर पवार, माणिक शेंद्रे, प्रकाश मेश्राम व पोलिस पाटील संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
ग्राम पोलीस पाटलांच्या कुटुंबातील सदस्यांना लस उपलब्ध करून द्यावी - पोलीस पाटील संघटनेची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 02, 2021
Rating:
