युवकाच्या पॅन्टच्या खिशात चिट्टी मिळाल्याने उडाली खळबळ, त्यांचेवर आधी कारवाई करा..तेव्हाच मृत्यूदेह आम्ही घेतो; नातेवाईकांनी घेतली आक्रमक भूमिका
सह्याद्री न्यूज | दिलदार शेख
मारेगाव, (ता.२३) : नुकतेच हाती आलेल्या माहिती नुसार मृतकाच्या कुटुंबियांनी प्रमोदच्या आत्महत्याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करीत नाही जो पर्यंत मृत्यूदेह आम्ही घेणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली.
शहरातील प्रभाग क्र. ४ मधील ३५ वर्षीय विवाहीत युवकाने महादेव मंदीर परिसरातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक २३ जून बुधवारला ३ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली होती.
प्रमोद किसन ठेंगणे असे,आत्महत्या करणाऱ्या विवाहित तरुणाचे नाव असून, या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान,पोलीस पंचनामा करीत असताना आत्महत्या केलेल्या युवकाच्या पॅन्टच्या खिशात चिट्टी मिळाल्याने त्या चिठ्ठीत काही लोकांचे नाव असल्याने विविध चर्चेला गावात पेव फुटून उलट सुलट चर्चा केल्या जात आहे.
मृतक प्रमोद हा काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचे बोलले जात असून, त्या 'सुसाईट नोट' मध्ये नावं असलेल्यावर कारवाई करण्याची आता मागणी जोर धरू लागली असून प्रशासन काय पाऊल उचलते याकडे शहरवाशियांचे लक्ष लागले असतांना या घटनेला एक वेगळेच वळण आले.
मृतकाच्या कुटुंबियांनी प्रमोदच्या आत्महत्याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करीत नाही जो पर्यंत मृत्यूदेह आम्ही घेणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
युवकाच्या पॅन्टच्या खिशात चिट्टी मिळाल्याने उडाली खळबळ, त्यांचेवर आधी कारवाई करा..तेव्हाच मृत्यूदेह आम्ही घेतो; नातेवाईकांनी घेतली आक्रमक भूमिका
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 23, 2021
Rating:
