सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (ता.२३) : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं नवीन रुग्ण आढळणंही कमी झालं आहे. या महिन्यात नाहीच्या बरोबर रुग्ण आढळले आहेत. १ ते २३ जून पर्यंत तालुक्यात केवळ ३७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना पूर्णपणे आटोक्यात आला असल्याचे सध्याचे चित्र आहे. आता मात्र ६ ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण राहिले आहेत. तालुका कोरोनामुक्त होण्याच्या अगदीच निकट आला आहे. तालुक्यात १९ पेक्षा कमी ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण राहिले असल्याने परसोडा येथील डेडिकेटेड शासकीय कोविड सेंटर २२ जून पासून बंद करण्यात आले आहे. तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५२६१ झाली असून ५१६२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर ९३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आता केवळ ६ ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण राहिले असून ३७ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. दोन दिवसांत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही.
कोरोनाने तालुक्यात उधम माजविल्यानंतर प्रशासनाने स्वतः रस्त्यावर उतरून मोर्चा सांभाळला. योग्य नियोजन व प्रभावी उपाययोजना करित कोरोनाची रुग्णवाढ आटोक्यात आणली. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांचा खरपुच समाचार घेतांनाच शहरात उसळणाऱ्या नागरिकांच्या गर्दीला आवर घातला. शहरात कडक निर्बंध लावून मार्गदर्शक तत्वांची कडक अंमलबजावणी करण्यात आली. प्रशासनाच्या या अथक प्रयत्नांमुळे कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर नियंत्रण मिळविता आले. त्यामुळे आता तालुक्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. कोरोना आता तालुक्यातून पळ काढू लागला आहे. कोरोनाचा संसर्ग होणं अगदीच कमी झालं असून तालुका कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. परत कोरोना डोके वर काढू नये, याकरिता नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विनामाक्स शहरात फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कार्यवाही करण्यात येत असल्याने नागरिक अजूनही जबाबदारीची जाणीव ठेऊन आहेत. कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने व सक्रिय रुग्ण केवळ सहाच राहिल्याने परसोडा येथील शासकीय कोविड केयर सेंटर बंद करण्यात आले आहे. सहा रुग्णांपैकी होम आयसोलेशनमध्ये दोन तर यवतमाळ व इतरत्र ४ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
तालुका कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर, राहिले आहेत केवळ सहा सक्रिय रुग्ण !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 23, 2021
Rating:
