सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (ता.२३) : शहरातील प्रभाग क्र.४ मध्ये वास्तव्यास असलेल्या ३२ वर्षीय विवाहीत युवकाने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवार दि. २३ जून २०२१ रोजी ३ वाजताच्या सुमारास ही उघडकीस आली. प्राप्त माहिती नुसार शहरातील प्रभाग क्र. ४ मधील वास्तव्यास असलेले प्रमोद किसनराव ठेंगणे अंदाजे (वय ३२ वर्ष) या विवाहीत युवकाने आज ३ वाजताच्या दरम्यान, मस्की यांच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्तेचे नेमकं कारण कळू शकले नसून प्रमोद यांच्या पाठीमागे आई, पत्नी, दोन मुले व विवाहित दोन बहिण असा आप्त परिवार आहे.
विवाहित तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या, मारेगाव येथील घटना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 23, 2021
Rating:
