टॉप बातम्या

मारेगाव शहरात भुरट्या चोरांच्या मुसक्या आवळण्याची मागणी

सह्याद्री न्यूज | दिलदार शेख 
मारेगाव, (ता.४) : मारेगाव शहरातील काही भागामध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट असल्याचे चर्चील्या जात आहे. कोरोना काळात हाताला कामं नसल्याने या भुरट्या चोरांनी शहरातील मिळेल त्यावर डल्ला मारण्याचा प्रकार सुरु केला असून वेळीच यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. याबाबत असे की, शहरातील दोन दुचाकी भुरट्या चोरांनी चोरून नेल्याच्या घटना घडली. अशातच लेआऊट मध्ये एक घर फोडून गहू,तादुळ, दाळ चोरून नेऊन कुलर व घरातील भाडे फेक फाक केल्याचे चित्र पहावयास मिळाले. तसेच मारेगाव शहरात मागील एक महिन्यापुर्वी नगरपंचायत परिसरातील प्रभाग क्र.३ मधील मागच्या बाजूला राहणाऱ्या शिवराम भोगेकर यांची स्प्लेडर प्लस MH 29. A.J.6564 या क्रमांकाची दुचाकी घरा समोरील रोडच्या बाजुला झाडाच्या सावलीत उभी ठेवली होती, भुरट्या चोरांनी संधी साधून दुचाकी चोरून नेली असल्याची घटना ताजी असताना सुभाष नगर परिसरातील दुचाकी चोरून नेण्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी घडल्याने शहरातील भुरट्या चोराचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Previous Post Next Post