टॉप बातम्या

बामर्डा येथील वाहतुकीचा पूल खचला; आमदार,खासदार यांचे दुर्लक्ष

सह्याद्री न्यूज | दिलदार शेख 
मारेगाव, (ता.४) :मारेगाव तालुक्यातील बामर्डा या गावाला जोडणारा जीर्ण पूल पूर्णपणे खचला असून सध्या त्या गावच्या लोकांचे हाल होत आहे. परंतु गावकऱ्यांनी याबाबत स्थानिक आमदारांना कळविले असून त्याकडे पूर्णपणे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
बामर्डा या गावाला जोडणारा पूल हा पूर्णपणे जीर्ण झालेला असून पुलाची एक बाजू खचलेली आहे. आता पावसाळा सुरु होत असल्यामुळे व या पुलाचे खोलीकरण कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना याचा पावसाळ्यात नाहक त्रास होतो. येत्या काही दिवसात पावसाळ्याचा हंगाम तोंडावर येत आहेत. अशातच शेतामध्ये पाणी जाऊन पिकाची मोठी हानी होते. तसेच पावसाळ्यामध्ये या पुलावरून पाणी वाहत असते. त्यामुळे गावातून बाहेर जायचे म्हणल्यास खूप तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी बाजारपेठ सदर गावावरून ३ कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे पुलाचे खोलीकरण कमी असल्यामुळे कधीकधी बाजार,प्राथमिक आरोग्य केंद्र यापासून वंचित रहाव लागत. शिवाय आजारपणात उपचारासाठी मुकावं लागतं. दर पावसाळ्यात पुलावरून पाणी असल्यामुळे गावाबाहेर गेलेल्या लोकांना कधीकधी महिलांना 'बस स्टॉप' ला रात्रभर मुक्काम करावा लागतो. एवढच नाही तर पुलालगत असलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी पिकाची हानी होते. सदर काही शेतकऱ्यांना हानी होऊन जवळपास पुला लगत असलेल्या शेत्या पुरामुळे उध्वस्त होतात. आतापर्यंत जवळपास २० ते ३० शेतीचे नुकसान पावसाळ्यात होते. त्यामुळे गावात आत्महत्याचे प्रकरण सुद्धा झालेले आहे. आता सध्या पावसाळा सुरु होतोय आणि कोरोना सुद्धा झपाट्याने खूप वाढत आहे. अशात रुग्णाला पुलावरून न्यायचे झाल्यास पुलावरुन नेणे शक्य नाही. शिवाय पावसाळ्यात बाळंतपण होणाऱ्या महिलांना व काही साथीच्या रोगाने वंचित होणाऱ्या रुग्णांना गावातच प्राण सोडावा लागणार असे नागरिकांनी संगितले. थोडीशी लाज शर्म असेल तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष द्यावे असे गावातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते धनंजय आसुटकर यांनी बोलून दाखवले आहे.
 
Previous Post Next Post