लोकनेते माजी राज्यमंत्री बाबुरावजी मडावी यांना वाहिली आदरांजली

सह्याद्री न्यूज | संतोष कुळमेथे
चंद्रपूर, (ता.१६) : राजूरा येथील शहीद बिरसा मुंडा चौक येथे लोकसेवक व गडचिरोली जिल्ह्याचे निर्माते बाबुराव मडावी माजी राज्य मंत्री यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. 
आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न, समस्या, अडचणी सोडविण्यासाठी बाबुराव मडावी यांनी खूप प्रयत्न केले. 
समाजाला एकत्र करण्यास खूप मोठा योगदान दिला आहे. 
पुण्यतिथी प्रित्यर्थ त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार व मोमबत्ती लावून त्यांना आज राजूरा येथील आदिवासी समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी मधुकर टेकाम, अशोक उईके, मधुकर कोटनाके, अरुण मेश्राम, धीरज मेश्राम, दत्ता कवथालकर, रमेश आडे, ऋषी मेश्राम, बंडू मडावी, संतोष कूलमेथे, अभिलाष परचाके, संतोष कूलमेथे सर प्रमुखाने उपस्थित होते.