सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई,(ता.११) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतिने राष्ट्रीय महासचिव डॉ.राजन माकणीकर यांनी केली आहे.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे तमाम वंचित, बहुजन, शेतकरी, कष्टकरी जणांचे कैवारी असून भारत भाग्य विधाते आहेत. खऱ्या अर्थाने शेतकरी कष्टकरी व महिलांचेच नसून या भारत देशाचे तारक आहेत.
याच रायगडाच्या पावन भूमी तुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांती घडवली आहे. बाबासाहेब आंबेडकारांच्या कार्याचे अनेक दाखले या भूमीतून इतिहासात पाहायला मिळतात, त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची ऐतिहासिक भूमी म्हणून रायगडाला ओळखले जाते.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवरायांचे नाव देऊन जसा गौरव करण्यात आला तसाच नवी मुंबई विमानतळाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देऊन गौरविण्यात यावे. हीच बाबासाहेबांच्या कार्याला या सरकार कडून खरी आदरांजली होईल, असा मनोदय पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केला.
पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या युवा व अभ्यासू नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष हरिभाऊ कांबळे, भाई विजय चव्हाण, भाई शिवा राठोड, राजेश पिल्ले यांच्या सह लवकरच एक शिष्टमंडळ सदरचा प्रस्ताव सरकार कडे दाखल करणार असल्याची माहिती कॅप्टन श्रावण गायकवाड यांनी दिली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे. - डॉ. राजन माकणीकर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 11, 2021
Rating:
