विशेष पोलिस पथकाची दारू तस्करीवर धाड,दारू तस्करीवरील दुसरी धडक कार्यवाही ; ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल केला जप्त

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.११) : वणी शहर व तालुक्यात फोफावलेले अवैध धंदे बंद व्हावे याकरिता जिल्हा पोलिस अधिक्षकांनी गठीत केलेले विशेष पोलिस पथक आता अवैध धंद्यात गुंतलेल्यांचा कर्दनकाळ ठरू लागले आहे. शहरातून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी होत असल्याच्या तक्रारी जिल्हा पोलिस अधीक्षकांपर्यंत गेल्याने त्यांनी त्यांनी दारू तस्करांवर धडक कार्यवाही करण्याकरिता हे विशेष पोलिस पथक तयार केले. दारू तस्करी, रेती तस्करी व इतर अवैध धंद्यांवर पाळत ठेऊन त्यांच्यावर धडक कार्यवाही करण्याची मोहीम विशेष पोलिस पथकानं हाती घेतली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे हे या विशेष पोलीस पथकाचे प्रमुख आहे. त्यांच्या नेतृत्वात विशेष पोलिस पथकानं सुरुवातीलाच धडक कार्यवाही करून साडेदहा लाखांची अवैध दारू पकडली. दोन दिवसांआधी वनोजा येथील एका शेतात साठवून ठेवलेल्या रेती साठ्यावर धाड टाकली. नंतर तपासाअंती तो वैध असल्याचे समोर आले. तर आज ११ जूनला सकाळी ४.३० वाजता या विशेष पोलीस पथकानं शहरातून चंद्रपूर येथे अवैध विक्रीकरिता जाणारा ७४ हजार ९२० रुपये किमतीचा दारू साठा जप्त केला. या धाडीत पोलिसांनी ३ लाख ३० हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दारू तस्करीवरची विशेष पोलिस पथकाची ही दुसरी धडक कार्यवाही आहे. 
विशेष पोलीस पथक शिरपूर परिसरात गस्त घालत असतांना त्यांना वणी वरून चंद्रपूर येथे अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे चारगाव चौकी येथे सापळा रचला असता वणी वरून टाटा इंडिगो क्रं. MH ३० AA ५०४० हे चार चाकी वाहन भरधाव येतांना दिसले. वाहन चालकाला पोलिस दिसतातच त्याने चारगाव चौकी पासून यु टर्न घेऊन वणीकडे पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस पथकाने त्या वाहनाचा पाठलाग करून मालू पेट्रोलपंप पासून १०० मीटर अंतरावर वाहन थांबविले. वाहन चालकाला त्याचे नाव विचारले असता त्याने दिलशाद सादिक काझी (२५) रा. सपना टॉकीज मागे, जलनगर वार्ड असे सांगितले. वाहनाची झडती घेतली असता त्यात देशी दारूचे १७ बॉक्स व विदेशी दारूच्या चार पेट्या आढळून आल्या. देशी दारूच्या ९० मिली क्षमतेच्या १७०० शिश्या किंमत ४४२०० रुपये व विदेशी दारूच्या १८० मिली क्षमतेच्या चार पेट्या (१९२ नग) किंमत ३०७२० रुपये तसेच टाटा इंडिगो कार किंमत २ लाख ५० हजार रुपये, एक स्मार्ट फोन किंमत ५००० रुपये, एका साधा फोन किंमत १००० रुपये असा एकूण ३ लाख ३० हजार ९२० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सदर वाहन चालकाला कुणाच्या सांगण्यावरून दारू तस्करी करीत असल्याचे विचारले असता त्याने विक्की आत्राम सपना टॉकीज मागे जलनगर वार्ड याचे नाव सांगितले. वणी येथील सुधीर पेटकर याला फोन केला असता त्याने डोर्लीकर यांच्या देशी दारू दुकानाच्या मागील खुल्या जागेवर बोलावून दारूचा साठा दिला. सदर दारूचा साठा विक्की आत्राम याच्या सांगण्यावरून अक्षय बुरडकर रा. सपना टॉकीज मागे जलनगर वार्ड या अवैध दारू विक्रेत्याला पोहचवीत असल्याचे त्याने पोलिस तपासात कबुल केले. पोलिसांनी दिलशाद सादिक काझी याच्यावर म. दा. का. च्या कलम ६५ (अ)(ई) व सहकलम १३०,१७७ मो. वा. का. नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे, विशेष पोलीस पथकाचे मुकेश करपते, राजू बागेश्वर, जितेश पानघाटे, मिथुन राऊत, भुसे, अजय यांनी केली.
विशेष पोलिस पथकाची दारू तस्करीवर धाड,दारू तस्करीवरील दुसरी धडक कार्यवाही ; ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल केला जप्त विशेष पोलिस पथकाची दारू तस्करीवर धाड,दारू तस्करीवरील दुसरी धडक कार्यवाही ; ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल केला जप्त Reviewed by सह्याद्री चौफेर on June 11, 2021 Rating: 5
Powered by Blogger.