शि.प्र.मं मा. मुख्याध्यापक प्रमोदजी क्षीरसागर यांचे हस्ते वृक्षारोपण

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 
वणी, (ता.११) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालयात मित्रपरिवार टीम यांच्या वतीने शिक्षण प्रसारक मंडळ महाविद्यालयाचे माननीय मुख्यधापक प्रमोद क्षिरसागर सर यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.
       कार्यक्रमाला सहभागी महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री.रमेश तामगाडगे सर ,श्री. मालगडे सर,श्री. मडावी सर, श्री.लांडे सर उपस्थित होते,कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा होता की, सद्याची स्थिती लक्षात घेता कोरोना महामारीमुळे लोकांचे आरोग्य हे बिकट होत चालले आहे. ऑक्सिजन चा तुटवडा झाला आहे. वृक्ष लावल्याने ऑक्सिजन पुरवठा होते. म्हणून सर्वाना जागरूक करण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, आपण बघतो की, पर्यावरण धोक्यात आहे आणि आरोग्याला हानी पोहचतांना दिसून येत आहे म्हणून वृक्ष लावणी करून पर्यावरणाचे संरक्षण करणे अतिशय गरजेचे आहे वृक्ष हे फक्त आपल्याला सावलीच देत नसून ते आपल्याला ऑक्सिजन देते आणि निसर्ग हा हिरवागार दिसावा म्हणून वृक्ष लावण्यात आले, या मोहिमेला माजी विद्यार्थी राणी मेश्राम, आकाश जीवतोडे, पल्लवी मेश्राम, प्रतीक क्षीरसागर, सुरभी माहकुलकर,पल्लवी क्षीरसागर उपस्थित होते.
शि.प्र.मं मा. मुख्याध्यापक प्रमोदजी क्षीरसागर यांचे हस्ते वृक्षारोपण शि.प्र.मं मा. मुख्याध्यापक प्रमोदजी क्षीरसागर यांचे हस्ते वृक्षारोपण Reviewed by सह्याद्री चौफेर on June 11, 2021 Rating: 5
Powered by Blogger.