सह्याद्री न्यूज नेटवर्क |
नागपूर, (ता.२३) : राष्ट्रीय ओबीसी महासंघ दिवसानंतर आपली एक आंदोलनात्मक तयारी करण्यासाठी १५ जून २०२१ रोजी संपन्न झालेल्या ओबीसी महासंघाने हा निर्णय घेतला आहे.
४ मे रोजी सर्वत्र महासंघाने दिलेल्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी प्रवर्गात मिळत असलेले २७% आरक्षण रद्द ठरविण्यात आले असून जो पर्यंत हे राज्य सरकार समर्पित आयोग स्थापन ( Dedicated Commission) करून Empirical Data गोळा करून माहिती सर्वत्र न्यायालयात सादर करणार नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी प्रवर्ग आरक्षण मिळणार नाही. तसेच केंद्र सरकार सुद्धा घटनेच्या कलम २४३ D व T यामध्ये सुधारणा करून देशातील ओबीसी प्रवर्गाचे राजकीय २७ टक्के आरक्षण ठेवू शकते.
१. राष्ट्रीय ओबीसी महासंघ २७ जून २०२१ ला सर्व जिल्ह्याअधिकारी व तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व प्रधानमंत्री व इतर मान्यवरांना निवेदन पाठवणार.
२. दिनांक २६ व २७ जून २०२१ रोजी लोणावळा येथे ३०० ओबीसी चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. असे ही पत्रकार परिषदेत ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी माहिती दिली.
"एल्गार"....! संपूर्ण ओबीसी समाजाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा... प्रा. बबन तायवाडे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 23, 2021
Rating:
