कोर्टाचा मनाई हुकूम असताना बळजबरीने शेतात घुसून शेतातील पिक नष्ट करणाऱ्यां आरोपीवर त्वरीत कार्यवाही करा, अन्यथा आमरण उपोषण
सह्याद्री न्यूज नेटवर्क |
झरीजामणी, (ता.२२) : तालुक्यातील मौजा पीवरडोल येथील शेतकरी श्री.दत्तू पुंजाराम गुरनूले यांची वडीलोपार्जित शेत जमीन आहे.या जमिनीचा कोर्टात वाद चालू असून गैरअर्जदार मधूकर अर्जुना यांचे विरोधात मा.दिवानी न्यायालय झरी-जामणी व उपविभागीय अधिकारी, वणी यांचे कोर्टातून या शेतात प्रवेश करण्यास मनाई हुकूम आहे,तसेच पाटण पोलीस स्टेशन ने दि.०७/०६/२०२१ला भा.द.वी. कलम १४९ जा.फौ. नुसार नोटीस बजावून या शेतात घुसून कोणताही अनुचित प्रकार तथा वादविवाद घालण्यास प्रतिबंध घातला आहे. असे असतांना दिनांक १६/०६/२०२१ रोजी ११.३० च्या दरम्यान मधूकर गुरनूले यांनी प्रतिबंधित शेतात आपल्या सहकारयासोबत बेकायदेशीर मार्गाने घुसून या शेतत नूकतेच उगवलेले पीक वखराणे वखरुण नष्ट केले, आणि कोर्ट, उपविभागीय अधिकारी व पोलीस मनाई हुकूम तोडून काढण्याचा गुन्हा केला आहे. अशा या कायद्याचा भंग करणाऱ्या गैरअर्जदार व त्याच्या सहकरयांवर त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करून त्वरित अटक करण्यात यावी अन्यथा आपल्याला न्याय मिळवून घेण्यासाठी आम्हाला आमरण उपोषण करावे लागेल असा इशारा देणारी लेखी तक्रार मा.जिल्हाधिकारी,यवतमाळ, मा.जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ व मा.पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन,पाटण यांना अन्याय ग्रस्त शेतकरी श्री. विश्वनाथ दत्तू गुरनूले यांनी केली आहे.
मौजा पिवरडोल ता. झरी-जामणी येथील शेत स.नं. ३९ क्षेत्र ५.८६ हे.आर ही शेत जमीन श्री दत्तू गुरनूले याचे ताब्यात व वाहितीत आहे. ही शेतजमीन दत्तू गुरनूले यांचे वडील पुंजाराम गुरनूले यांना कुळात लागलेली जमीन होती आणि पुंजाराम यांना अर्जुना व दत्तू अशी दोन मुले आहेत. वडील पुंजाराम यांच्या मृत्यू नंतर मात्र,मोठ भाऊ अर्जुना यांनी आपला लहान भाऊ दत्तू याला या जमीनितील अर्धा हक्क आहे. हिस्सा द्यायला पाहिजे होता परंतु तसे न करता बापाची पुर्ण जमीन आपल्याच खाता यावी म्हणून तो लहान भावाला हा हिस्सा द्यायला तयार नव्हता. म्हणून दत्तू आपल्याला मुलगा या वारस हक्काने वडीलोपार्जित शेत जमिनीत अर्धा हक्क मिळावा म्हणून मा. दिवानी न्यायालय वणी येथे केस दाखल केली व न्यायालयाने ही बाब मान्य करून दत्तू हा पुजारामचा लहान मुलगा असून, त्याचा वडीलाच्या शेतावरील अर्धा हिस्सा व हक्क मान्य करुन आणि प्रत्यक्ष वाटणी करून ताब्यात देण्यासाठी १९७१ ला आदेश केला. परंतु अर्जुना यांनी कोर्टाचा आदेश असूनही दत्तूला हिस्सा दिला नाही. कालांतराने अर्जुनाचा मृत्यू झाला आणि तेव्हापासून ही संपूर्ण शेतजमीन दत्तू यांच्या ताब्यात असून ती ५० वर्षांपासून वाहून खात आहे.
मधूकर गुरनूले यांनी कोणत्याही सक्षम प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय गैरकायदेशिर मार्गाचा वापर करून संपूर्ण शेत दुसऱ्यांला विकले त्यामुळे या जमीनीवर विकत घेणाराच्या नावाने फेरफार करण्यात आला. त्यामुळे यावरून मधूकर यांचे नाव या शेतावरू उडून विकत घेणारयाचे नाव चढले आहे. त्यामुळे या शेतावर मधूकर यांचा कुठलाही हक्क उरला नाही. या गैरकायदेशिर विक्रीविरूध्द दत्तू गुरनूले यांनी दिवानी न्यायालय झरी-जामणी येथे ही गैरकायदेशिर विक्री रद्द करण्यासाठी केस दाखल केली असता, या कोर्टाने ही विक्री रद्द करून दत्तू गुरनूले याचा या शेतावर हक्क मान्य केला आहे. या विरुद्ध शेत विकत घेणारा कींवा मधूकर गुरनूले यांनी कुठल्याही अपील केली नाही किंवा कुठलाही विरोध केला नाही. उपविभागीय अधिकारी वणी यांनी कोर्टाच्या आदेशानुसार शेत विकत घेणाराच्या नावाचा फेरफारही रद्द करण्यात आला आहे. परंतु गैरअर्जदार कोणताच कायदेशीर विरोध दर्शविण्यास आला नाही व त्याचा कालावधीही संपला आहे. त्यामुळे कोर्टाने दत्तू गुरनूले यांचा त्यांच्या हिस्स्यासहित संपूर्ण शेतावर त्यांचा ताबा व वहीवाट मान्य केली आहे. परंतु गैरअर्जदार त्याचा अधिकार या जमीनीवर नसतांनाही व त्याला ईथे प्रवेश करण्याचा मनाही हुकूम असतांना या शेतात घुसून या शेतावर बळजबरीने आपला ताबा मिळविण्यासाठी गुडगीरी करून दत्तू गुरनूले यांना व त्यांच्या कुटुंबातील लोकांना शेतात घूसून मारझोड करणे, स्त्रियांना अश्लील शिविगाळ करून त्यांची बेअब्रू करणे व जीवानिशी संपवून टाकण्याच्या धमक्या देवून त्याना मानसिक, शारिरीक इजा पोहचवून आर्थिक हानी करीत आहे. मात्र याविरुद्ध पोलीस स्टेशन पाटणला तक्रारी केल्यावरही पोलीस त्यांच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारकर्ते विश्वनाथ गुरनूले यांनी केला आहे. आणि गैर अर्जदारावर तात्काळ फौजदारी कारवाई करून गुन्हे दाखल करून अटक करावी व आमच्या पिकाची गैरअर्जदांनी केलेली अंदाजे ३०००००/ तीनलाख रुपये वसूल करून द्यावे अन्यथा आम्ही आमरण उपोषणाला बसू व पुढे आमच्या झालेल्या जान माल नुकसानीला गैरअर्जदार व पुलीस प्रशासन जबाबदार राहील असे वीश्वनाथ गुरनूले व त्यांच्या कुटूंबियांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
कोर्टाचा मनाई हुकूम असताना बळजबरीने शेतात घुसून शेतातील पिक नष्ट करणाऱ्यां आरोपीवर त्वरीत कार्यवाही करा, अन्यथा आमरण उपोषण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 22, 2021
Rating:
