वनोजा देवी येथील पाण्याची टाकी बनली शोभेची वस्तू

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
मारेगाव, (ता.२३) : तालुक्यातील वनोजा येथील पाण्याची पाणी पुरवठा टाकी गेली सहा महिन्यापासून शोभेची वस्तू बनली आहे. असे मनसेचे रोशन शिंदे यांनी सांगितले.
गेली सहा महिने पाण्याची टाकीचे काम पूर्ण होऊन सुद्धा ग्रामपंचायत ला सोपविली नसून का? ग्रा. पं. कडे सोपविली जात नाही, घोडं अडलं कुठे असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांना वेळेत आणि हातपंप व विहीर यामध्ये जाणारा वेळ वाचावा म्हणून नळ योजना गावात आणली गेली. मात्र, येथील नागरिकांना या नळ योजनेचा तीळ मात्र लाभ मिळत नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. मनात आले तेव्हा पाणी सोडतात, नाही तर दोन दोन महिने नळाचे पाणी मिळत नाहीत असेही ते म्हणाले.

सत्तर वर्षाच्या काळात नाला,विहीर आणि हातपंप ओढून ओढून जीवाचे हाल झाले, तेव्हा आता कुठे? नळ योजना आली म्हणायला हरकत नाही. आता पाण्याची टाकी बांधली,परंतु तेही नियमित मिळत नाही. आता पर्यंत जवळपास तीनसे लाभार्थ्यांनी नळ कनेक्शन घेतले असून नळाच्या पाण्याची प्रतीक्षा लाभार्थ्यांना आज येईल उद्या मिळेल अशी आशा आहेत.

परंतु ही पाण्याची टाकी नागरिकांना वाकुल्या दाखवत असून शोभेसाठी वस्तू बांधली की, काय? यावर कोणीच का बोलत नाही,असे मनसेचे रोशन शिंदे यांनी 'सह्याद्री ई न्यूज' बोलतांना म्हणाले. 
वनोजा देवी येथील पाण्याची टाकी बनली शोभेची वस्तू वनोजा देवी येथील पाण्याची टाकी बनली शोभेची वस्तू Reviewed by सह्याद्री चौफेर on June 23, 2021 Rating: 5
Powered by Blogger.