आर्या डेव्हलपर्सकडून सातारकरांची घोर फसवणूक

सह्याद्री न्यूज | अतुल खोपटकर
सातारा, (ता.२३) : शहरातील यादोगोपाळ पेठेतील सतीश परशुराम भोसले यांची असलेली मिळकत क्र. 63, 64, 65, 66, 68, 69 ही जागा विकसनधारक विद्या दिग्विजय गायकवाड आणि दिग्विजय आनंदराव गायकवाड (आर्या डेव्हलपर्स) यांनी बांधकाम करायला घेऊन बेसमेंटमध्ये स्टोअर न करता दोन फ्लॅट बांधून विकले. त्यांनी सातारा नगरपालिका मध्ये दिलेल्या आराखड्यानुसार स्टोअर न करता रहिवासी कामासाठी वापर करून नगरपालिकेची आणि दोन कुटुंबाची फसवणूक केली आहे. त्यामुळे नगरपरिषदेकडून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
विद्या दिग्विजय गायकवाड आणि दिग्विजय आनंदराव गायकवाड (आर्या डेव्हलपर्स) यांनी अश्याच प्रकारे मंगळवार पेठेत वृंदावन सोसायटीचे बांधकाम करताना पुन्हा नियम पायदळी तुडवले असून तेथील सर्व फ्लॅटधारक याबाबत न्याय मिळवण्यासाठी कोर्टात गेले आहेत. 
बिल्डर बांधकाम पुर्ण करून विकेपर्यंत त्याच्या कामात बेकायदेशीरपणा न दिसता, गोर गरीब जनता पै-पै जमवून घर खरेदी करते, राहायला जाते तेव्हाच बेकायदेशीर बांधकामाची नोटीस कशी मिळते? असा सवाल प्रत्येक सदनिकाधारक आपल्या प्रशासनाला विचारीत आहे.
आर्या डेव्हलपर्सकडून सातारकरांची घोर फसवणूक आर्या डेव्हलपर्सकडून सातारकरांची घोर फसवणूक Reviewed by सह्याद्री चौफेर on June 23, 2021 Rating: 5
Powered by Blogger.