टॉप बातम्या

मारेगावात ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्साह; भव्य मिरवणुकीने वेधले लक्ष

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगावशहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा सण उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. नात शरीफच्या स्वरांनी दुमदुमलेला परिसर, मक्का-मदीना व काबा शरीफच्या आकर्षक प्रतिकृती आणि युवकांची शिस्तबद्ध बाईक रॅली यामुळे मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

गौसिया मशिदीवर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई विशेष आकर्षण ठरली. मशिदीच्या प्रांगणात इस्लामिक ध्वज फडकवून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीदरम्यान युवकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

चांदशहा दर्गा, नगरपंचायत आणि मार्डी रोड मार्गे मिरवणूक पुन्हा गौसिया मशिदीजवळ पोहोचली. मार्गावर नागरिकांनी सरबत, मिठाई व अल्पोपहाराचे वाटप करून सहभागींचे स्वागत केले. त्यामुळे उत्सवाला सामाजिक सलोख्याची किनार लाभली.

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या नियोजनामुळे संपूर्ण सोहळा शांततेत पार पडला.

यानंतर झालेल्या धार्मिक सभेत मौलाना हाफिज रेहान रजा व हाफिज अब्दुस सलाम रशीदी यांनी हजरत पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. मानवतेची सेवा, प्रेम, परोपकार आणि बंधुभाव हीच मोहम्मद पैगंबरांची शिकवण असून ती आचरणात आणण्याचे आवाहन त्यांनी केले.

धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक ऐक्य आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या सोहळ्याने मारेगावच्या सर्वधर्मसमभावाची सुंदर झलक दाखवून दिली.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();