टॉप बातम्या

पोळा व आगामी सणांसाठी खादी कॉटनची खास खरेदी; तीन वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास कायम!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : रक्षाबंधनाचा उत्साह संपताच आता पोळा आणि आगामी सण-उत्सवांची चाहूल लागली आहे. सणासुदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली असून, गेल्या तीन वर्षांपासून वणीत सातत्याने सुरू असलेल्या जय महाराष्ट्र खादी कॉटन महा सेलने यंदाही ग्राहकांसाठी खादी कॉटन कपड्यांची आकर्षक रेंज उपलब्ध करून दिली आहे.
तीन वर्षांच्या काळात ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या या महा सेलमध्ये पुरुष, महिला तसेच कुटुंबातील प्रत्येकासाठी मनपसंद खादी कॉटन कपडे उपलब्ध आहेत. पारंपरिक पोशाखापासून दैनंदिन वापरातील आरामदायी कपड्यांपर्यंत विविध पर्याय एकाच ठिकाणी मिळत असल्याने सणाच्या खरेदीसाठी ग्राहकांना मोठी सोय होत आहे.

महा सेलमध्ये खादी हाफ शर्ट, फुल शर्ट, व्हाईट शर्ट-पायजामा, मोदी कुर्ता, नेहरू कुर्ती, संग्राम पठाणी, जूट/पेपर खादी शर्ट, जॅकेट-बंडी, बंगाली खादी, खादी पॅन्ट, टॉवेल, रुमाल यासह विविध प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत.

विशेष म्हणजे खादी हाफ शर्ट २५० रुपये, फुल शर्ट ३०० रुपये, तसेच फुल शर्ट १००० रुपयांत ४ आणि महिलांसाठी लेडीज खादी कुर्ती १००० रुपयांत ४ अशी आकर्षक ऑफर ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
पोळ्याच्या सणासाठी पारंपरिक लूक असो किंवा आगामी सणांसाठी खास पोशाखाची निवड—दर्जेदार खादी कॉटन, मनपसंद डिझाईन आणि परवडणाऱ्या दरात खरेदीची संधी ग्राहकांना येथे मिळत आहे.

तीन वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या महा सेलला यंदाही भेट देऊन आपल्या आवडीच्या खादी कॉटन कपड्यांची सणासुदीची खरेदी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

🌀 स्थळ : जैताई मंदिर, वणी (यवतमाळ रोड), साई मंदिरासमोर, वणी
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();