सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
वणी : आगामी श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वणी येथील ‘जय श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती’ची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडली. निवर्तमान अध्यक्ष ॲड. कुणालबाबू चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वर्ष २०२६-२७ साठी त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करीत ॲड. कुणाल विजय चोरडिया यांची सर्वानुमते अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्षांच्या अनुमतीने सभेच्या सर्वानुमते उत्सव समितीची नूतन कार्यकारिणी तसेच वरिष्ठ सल्लागार समिती जाहीर करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीत अध्यक्ष ॲड. कुणाल विजय चोरडिया, उपाध्यक्ष शुभम मदान व श्याम लाहारिया, कार्याध्यक्ष राहुल मुंजेकर, सहकार्याध्यक्ष अभय नागतुरे, सचिव उमेश पोद्दार, सहसचिव सुधीर तलसे, कोषाध्यक्ष जयंत पांडे, सहकोषाध्यक्ष राजू रिंगोले, संयोजक अमोल धानोरकर, प्रसिद्धी प्रमुख आशिष सिसोदिया (जैन), सहप्रसिद्धी प्रमुख दीपक पाऊणकर, सोशल मीडिया प्रमुख पार्थ त्रिवेदी आणि प्रिंट मीडिया प्रमुख सौरभ राजुरकर यांचा समावेश आहे.
वरिष्ठ सल्लागार समितीत विजय चोरडिया, आशिष गुप्ता, निकेत गुप्ता, विजय पुण्यानी, दिवान फेरवानी, मूलचंद जोशी, राजाभाऊ बिलोरिया, महावीर कटारिया, नारायण गोडे, सुरेश मांडवकर, संतोष मार्कंडे, अनिल रेभे, विशाल दूधबडे, गजानन बत्तुलवार, पिंकी बत्रा, प्रा. दिलीप अलोणे आणि मयूर गेडाम यांची निवड करण्यात आली.
बैठकीत आगामी त्रिदिवसीय श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच भव्य रॅलीचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले असून, महोत्सव यशस्वी करण्यासाठी विविध उपसमित्यांचीही घोषणा करण्यात आली.
दरवर्षी उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणारी ‘भव्य नृत्य स्पर्धा’ यंदाही ‘जय श्रीकृष्ण जन्माष्टमी महिला समिती’च्या वतीने भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या जन्माष्टमी महोत्सवात धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक उपक्रमांचीही रंगत वाढणार आहे.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विशाल दूधबडे यांनी केले. यावेळी समितीचे नवनियुक्त पदाधिकारी, सल्लागार व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


