टॉप बातम्या

पोलीस परिसर फुलला स्वस्तिक वृक्षारोपणाने

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मारेगाव पोलीस ठाण्याच्या परिसरात तब्बल ९०० वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षारोपण मोहिमेमुळे पोलीस परिसर हिरवागार होण्यास सुरुवात झाली असून, परिसराचे सौंदर्यही खुलले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. वृक्षारोपण मोहिमेचे नेतृत्व पोलीस निरीक्षक सागर दानडे यांनी केले, तर शनमुका नाथन यांनी 'स्वस्तिक पॅटर्न'च्या माध्यमातून वैज्ञानिक व नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण वृक्षलागवडीचे नियोजन व अंमलबजावणी केली.

या उपक्रमात पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भविष्यात स्वच्छ, हरित आणि प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हे वृक्षारोपण करण्यात आले.

लावण्यात आलेल्या रोपांची नियमित निगा राखून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. "वृक्ष लावा, वृक्ष जगवा" हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देणारा हा उपक्रम नागरिकांकडूनही कौतुकास पात्र ठरत आहे.

मारेगाव पोलीस ठाण्याने राबविलेला हा पर्यावरणपूरक उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत असून, इतर शासकीय कार्यालयांनीही अशा उपक्रमांचे अनुकरण करावे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();