टॉप बातम्या

वणीत वरली मटका अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहरातील दीपक चौपाटी नगर परिसरात सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या अवैध वरली मटका जुगारावर वणी पोलिसांनी कारवाई करत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १८ मे रोजी दुपारी २.३० ते ३ वाजताच्या सुमारास नगरपरिषद कॉम्प्लेक्सजवळील सार्वजनिक ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी अब्दुल शब्बीर अब्दुल रहेमान (वय ५७, रा. मोमिनपुरा, वणी) हा लोकांकडून पैसे घेऊन वरली मटक्याचे आकडे लिहिताना आढळून आला.

कारवाईदरम्यान पोलिसांनी मटका आकडे लिहिलेली पट्टी बुक, कार्बनचा तुकडा, पेन तसेच आरोपीच्या खिशातून २ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल जप्त केला. चौकशीदरम्यान सदर मटका व्यवसायाचा मालक अशीद खान अजहर उल्ला खान (वय ३७, रा. गुरुनगर, वणी) असल्याचे आरोपीने सांगितले. तसेच आपण त्याच्याकडे रोजंदारीवर काम करत असल्याची माहितीही दिली.

या प्रकरणी पोहेकॉ अविनाश वामनराव चिकराम यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) तसेच बीएनएस कलम ४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका मारोती पाटील, वणी करीत आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();