टॉप बातम्या

बोटोणी ग्रामपंचायतीतील अवैध बांधकाम प्रकरण तापले; माजी सदस्याची गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील मौजा चि.बोटोणी येथील शेत शिवारात सुरू असलेल्या कथित अवैध बांधकाम प्रकरणाने पुन्हा एकदा ग्रामपंचायत प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या संदर्भात माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश उईके यांनी पंचायत समिती मारेगावचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, ग्रामपंचायत हद्दीत सौ. परिनिता परमानंद जयस्वाल यांच्या अवैध बांधकामाबाबत यापूर्वीही ग्रामपंचायत अधिनियमांतर्गत नोटीस बजावण्यात आली होती. संबंधित बांधकामाचे छायाचित्र तसेच नोटीसची प्रतही तक्रारीसोबत जोडण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

तक्रारदारांनी म्हटले आहे की, नोटीस बजावल्यानंतरही संबंधित बांधकाम थांबविण्यात आले नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच संबंधित बांधकाम सुरूच असल्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तत्काळ हस्तक्षेप करून सात दिवसांच्या आत आवश्यक कारवाई करावी, अन्यथा पुढील काळात उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();