सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यवतमाळ : वाढत्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी शासकीय वाहनाऐवजी सायकलचा वापर करत कार्यालय गाठून एक सकारात्मक संदेश दिला.
इंधनाची बचत, पर्यावरण संरक्षण आणि साधेपणाचा आदर्श नागरिकांसह सर्व शासकीय विभागांसमोर त्यांनी ठेवला आहे.
सामान्य जनतेला काटकसरीचा संदेश देताना प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही कृतीतून आदर्श निर्माण करावा, असे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे.