आज मारेगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर'

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : महमूल मंडळ मारेगाव, तालुका मारेगाव यांच्या वतीने आज दिनांक १५/५/२०२५, शुक्रवार रोजी सकाळी ठीक १०-०० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगांव येथे “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर कार्यक्रम टप्पा १” चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये महसूल विभागामार्फत विविध शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना दिला जाणार आहे.

शिबिरात उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, फेरफार, जमीन संदर्भातील विविध प्रकरणे तसेच इतर महसूल विषयक अडचणींचे निराकरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

महसूल विभागाने परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार उत्तम निलावाड यांनी केले आहे. तसेच आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहण्याचेही सांगण्यात आले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();