टॉप बातम्या

“शेतकऱ्यांच्या उभारीसाठी नवा मार्ग; वणीत ‘माँ जगदंबा’ शाखेचे लोकार्पण”

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणीशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतीसोबत जोडधंदा करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले. केवळ निसर्गावर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय स्वीकारल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळू शकते, असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

संत गाडगे महाराज चौक, वणी येथे माँ जगदंबा नागरी सहकारी पतसंस्था, पांढरकवडा-वणी शाखेच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मकरंद अनासपुरे उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात व मोठ्या प्रतिसादात पार पडला.

संस्थेच्या आधीच तीन शाखा यशस्वीपणे कार्यरत असून वणीतील ही चौथी शाखा ठरली आहे. भविष्यात शाखांचा विस्तार करून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक बळ देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान अथर्व लिंगमपल्लीवार याच्या भावपूर्ण गीताने उपस्थितांना भावूक केले. त्याच्या सादरीकरणाची मकरंद अनासपुरे यांनी विशेष दखल घेत कौतुक केले. तसेच नंददीप फाउंडेशनचे संदीप शिंदे व त्यांच्या पत्नी निराधार व मानसिक रुग्णांसाठी करत असलेल्या कार्याचेही सर्व स्तरांतून कौतुक झाले. या सामाजिक कार्यासाठी आमदार व माजी आमदारांनी आर्थिक सहाय्य जाहीर करून पाठबळ दर्शवले.

नितीन पखाले यांनी नंददीप फाउंडेशनच्या कार्याची माहिती देत ‘बेघर निवारा केंद्र’ संकल्पना स्पष्ट केली. दरम्यान, शिव आनंद लाठी-काठी ग्रुपची युवा प्रशिक्षक तेजस्विनी गव्हाणे हिचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर, नगराध्यक्षा विद्याताई आत्राम, पणन महासंघाचे संचालक संजय खाडे, केशव नागरी पतसंस्थेचे सचिव अनिल अक्केवार, शब्दयात्रा प्रकाशनचे संचालक नितीन पखाले, ॲड. विनायकराव एकरे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश खुराणा, सहायक निबंधक सचिन कुळमेथे, लेखा परीक्षक आनंद लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष गजानन बेजंकीवार यांनी प्रास्ताविकात संस्थेची प्रगती, आर्थिक स्थिती व भविष्यातील योजना मांडल्या. नव्याने सुरू झालेली वणी शाखा शहराच्या आर्थिक प्रगतीला चालना देत सर्वसामान्यांच्या सक्षमीकरणात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य व्यवस्थापक सचिन अग्रवाल यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरज चाटे यांनी मानले.

यावेळी काशिनाथ मिलमिले (उपाध्यक्ष), रमेश भुरे (सचिव), विरभद्र पाटील, दिलीप अंगलवार, राजेश पसलावार, सुनील ठाकरे, भरत पोतराजे, विरेंद्र तोडकरी, विलास बनकर, सौ. ज्योती अडपावार, सौ. अर्चना धुंडी, अजय पालतेवार, तसेच चारही शाखांचे व्यवस्थापक व कर्मचारी, नागरिक, खातेदार आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();