टॉप बातम्या

पालकमंत्री संजय राठोड निभावत आहेत 'पालकाची' भूमिका" – इंदिरा बोंदरे यांनी मानले जाहीर आभार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

यवतमाळ: कोलाम जमातीच्या प्रदीर्घ संघर्षाला अखेर न्याय मिळाला असून, समाजाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या लोकप्रतिनिधीने खऱ्या अर्थाने 'पालक' म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजयभाऊ राठोड यांनी कोलाम बांधवांसाठी घेतलेले ऐतिहासिक निर्णय हे समाजाच्या प्रगतीची नवी पहाट ठरत आहेत, अशी भावना शामा दादा कोलाम ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सौ. इंदिराताई बोंदरे यांनी व्यक्त केली आहे.

सौ. इंदिरा बोंदरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर, ना. संजय राठोड यांनी कोलाम जमातीसाठी जाहीर केलेल्या कामांमुळे समाजात उत्साहाचे वातावरण आहे. या कामांचा आढावा घेताना सौ. बोंदरे यांनी पालकमंत्र्यांचे खालील बाबींसाठी विशेष आभार मानले:

ऐतिहासिक निधी व सभागृह: यवतमाळ शहरात समाजाच्या अस्मितेचे प्रतीक असणारे 'शामा दादा सभागृह' मंजूर करून त्यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून दिला.

पोडांचा विकास: विविध कोलाम पोडांवर सामाजिक आणि सामूहिक चर्चांसाठी हक्काच्या 'चवड्या' (चावडी) मंजूर केल्या, ज्यामुळे गावपातळीवरील प्रश्न सुटण्यास मदत होईल. भाषेची अडचण केली दूर: कोलाम जमातीचे प्रश्न त्यांच्याच बोलीभाषेत समजून घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी श्रीकांत तलवारे यांची विशेष 'स्वीय सहाय्यक' म्हणून नियुक्ती केली. प्रशासकीय स्तरावर कोलाम भाषेला असा सन्मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

स्वतंत्र अभ्यास आयोग: कोलाम जमातीच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी 'शामा दादा कोलाम स्वतंत्र अभ्यास आयोग' स्थापन करण्यासाठी पालकमंत्री सातत्याने पाठपुरावा करत आहेत आता खंबिरपने पाठीशी उभे राहण्याची वेळ असून याप्रसंगी अधिक बोलताना सौ इंदिरा बोंदरे म्हणाल्या की कोलाम जमातीच्या इतिहासात आजवर अनेकानी आश्वासने दिली मात्र ना संजय राठोड यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले की तेच आमचे खरे कैवारी आहेत. एका पालकाप्रमाने त्यांनी आमच्या मागण्याची दखल घेतली म्हणूनच समाजाच्या प्रगतीसाठी आणि हक्काच्या माणसाला बळ देण्यासाठी संपूर्ण कोलाम जमातीचे आता संजय राठोड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहने ही काळाची गरज आहे. 

पालकमंत्री संजय राठोड यांनी दाखवलेल्या या संवेदनशीलता बदल संपूर्ण कोलाम जमातीच्या वतीने सौ इंदिरा बोंदरे यांनी त्यांचे मनापासून आभार मानले.



Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();