सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
भद्रावती : सुरभी कॉलनी, श्री संताजी नगर येथे राहणारे श्री. अरुण भाऊराव खोब्रागडे व सौ. जयमलाताई खोब्रागडे यांची मुलगी सौ. स्वातीताई चांदेकर यांना तब्बल १२ वर्षांनंतर कन्यारत्न प्राप्त झाल्याच्या आनंदानिमित्त हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर भव्य सामुदायिक प्रार्थना व सुश्राव्य भजन संध्येचे आयोजन करण्यात आले.
खोब्रागडे व चांदेकर परिवार तसेच हनुमान मंदिर विश्वस्त समिती, सुरभी कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी धार्मिक वातावरणात भक्तीमय स्वरांनी परिसर दुमदुमून गेला. या कार्यक्रमास यवतमाळ जिल्हा (अ) विभागाचे प्रचार प्रमुख श्री. मारोतरावजी ठेंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरुदेव सेवा मंडळ वणी, मारेगाव व भद्रावती तालुक्यातील गुरुदेव प्रचारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध व स्तुत्य पद्धतीने करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांमध्ये वणी तालुका सेवाधिकारी दिलीप डाखरे, मारेगाव तालुका सेवाधिकारी सुनील देऊळकर, चंद्रपूर जिल्हा महिला सेवाधिकारी सौ. सुवर्णाताई पिंपळकर, प्रकाश पिंपळकर, कडूकरजी, प्रवीण भाऊ, सुरज येवले, प्रकाश मोरे, खुशाल उरकुडे, दिलीप मोरे, गणेश कडू, प्रथमेश दादा मोरे, किशोर जुमडे यांच्यासह परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामुदायिक प्रार्थना व भजन संध्या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.
