सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरातील मनीष नगर परिसरात असलेल्या विश्वरत्न बुद्ध विहारच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता विश्वशांती बुद्ध विहार, मनीष नगर येथे उत्सव समितीच्या वतीने सुप्रसिद्ध गायक अजित खंडारे व त्यांच्या संचाचा बुद्ध-भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमातून आंबेडकरी विचार, बौद्ध धम्म आणि सामाजिक संदेश यांचा सुरेल आविष्कार सादर केला जाणार आहे.
या कार्यक्रमाचा अधिकाधिक बौद्ध बांधवांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे उपाध्यक्ष बाबाराव चंदनखेडे यांनी केले आहे. तसेच, जयंतीनिमित्त आयोजित या सांस्कृतिक सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.