टॉप बातम्या

वणी नगर परिषद निवडणूक जाहीर: २ डिसेंबरला मतदान, ६२ केंद्रांवर होणार मतदान प्रक्रिया

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार वणी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. आदेश क्रमांक रानिआ-२०२५/निका/नप/प्र.क्र.१४/का-६ दिनांक ०४ नोव्हेंबर २०२५ नुसार ही निवडणूक पार पडणार आहे.

या निवडणुकीत वणी नगर परिषद क्षेत्रात एकूण १४ प्रभाग असून २९ जागांसाठी मतदान होणार आहे. प्रभाग क्रमांक ०१ ते १३ साठी प्रत्येकी अ आणि ब अशा दोन जागा आहेत, तर प्रभाग क्रमांक १४ मध्ये अ, ब आणि क अशा तीन जागांसाठी उमेदवार रिंगणात असतील. यासोबतच नगराध्यक्षाची थेट जनतेतून निवडणूक होणार असल्याने शहरात राजकीय रंगत चांगलीच वाढली आहे.

मतदान २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत होणार असून, त्यासाठी एकूण ६२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. नागरिकांनी आपल्या मतदान केंद्राची माहिती जाणून घेण्यासाठी दिलेल्या QR कोडचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “लोकशाहीचा उत्सव म्हणून या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करून लोकशाही मजबूत करा.”

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();